CJI Chandrachud News । सर्वोच्च न्यायालयाच्या कुकच्या लेकीने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कुकची लेक प्रज्ञा हिला ४१ लाखांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. प्रज्ञा आता अमेरिकेत कायदेचे शिक्षण घेणार आहे. कायदा संशोधक प्रज्ञाचा CJI म्हणजेच भारताचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांनी बुधवारी गौरव केला. प्रज्ञाने कॅलिफोर्निया विद्यापीठ किंवा अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली आहे.
भारताचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि इतर सर्व न्यायाधीश यांनी कामाच्या सुरुवातीच्या पहिले सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलातील न्यायाधीशांच्या विश्रामगृहात सर्वोच्च न्यायालयाचे कुक अजय कुमार सामल यांची मुलगी प्रज्ञा यांची भेट घेत अभिनंदन केले. वडिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात काम करताना पाहून प्रज्ञाला कायद्याचा अभ्यास करण्याची आवड निर्माण झाली होती.
CJI Chandrachud News । प्रज्ञा हिला अभिवादन केल्यानंतर CJI चंद्रचूड नेमकं म्हणाले…
‘आम्हाला माहित आहे की, प्रज्ञाने हे सर्व स्वतःहून केले आहे, परंतु आम्ही हे सुनिश्चित करू की तिला जे काही हवे आहे ते मिळवण्यात ती यशस्वी होईल. … आम्हाला आशा आहे की ती देशाची सेवा करण्यासाठी परत येईल. ती जे काही करेल त्यात ती उत्कृष्ट होईल आणि ती 1.4 अब्ज लोकांची स्वप्ने अगदी सहजपणे आपल्या खांद्यावर घेऊन जाईल.’
CJI DY चंद्रचूड यांनी तिला भारतीय संविधानावर केंद्रित असलेली तीन पुस्तके भेट दिली आणि प्रज्ञाने हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. या पुस्तकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी समल आणि त्यांच्या पत्नीला शाल भेट दिली. इतर न्यायाधीशांनीही प्रज्ञाला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सरन्यायाधीश आणि इतर न्यायमूर्तींच्या प्रेमळ वागण्याने भारावून गेलेल्या २५ वर्षीय वकील प्रज्ञा म्हणाल्या की, ‘CJI DY चंद्रचूड हे तिच्यासाठी एक प्रेरणा आहे. प्रत्येकजण त्यांना (न्यायमूर्ती चंद्रचूड) न्यायालयाच्या सुनावणीच्या लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे बोलताना पाहू शकतो. ते तरुण वकिलांना प्रोत्साहन देतात आणि त्याचे शब्द रत्नांसारखे असतात. ते माझ्यासाठी प्रेरणा आहे.’
हे वाचाल का ? अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दिल खुलं आव्हान म्हणाले,’त्यांनी महाराष्ट्राला सांगावं…’