Siddharth Jadhav Video| मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने मराठी चित्रपटासह बॉलीवूडमध्ये देखील काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारुन त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. परंतु सध्या सिद्धार्थ त्याच्या चित्रपटामुळे नाही तर एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकताच तो कामानिमित्त मुंबई ते गोवा असा विमानप्रवास करत होता. परंतु, या प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवाबाबत त्याने संताप व्यक्त केला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काय म्हणाला सिद्धार्थ जाधव? Siddharth Jadhav Video|
मुंबई ते गोवा असा एका नामांकित कंपनीच्या विमानातून प्रवास करताना त्याला कसा अनुभव आला याबद्दल त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. या व्हिडिओत सिद्धार्थ म्हणतो की, “हाय नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव मी आता नुकताच इंडिगो फ्लाइटने मुंबईहून गोव्याला आलो आहे. तुम्ही स्वत: बघा त्यांनी माझ्या बॅगेची कशी काळजी घेतली आहे. या लोकांनी फक्त माझ्या बॅगेचं हँडलच नीट ठेवले आहे.” Siddharth Jadhav Video|
Thnx @IndiGo6E pic.twitter.com/ZHqR41EcRO
— SIDDHARTH JADHAV 🇮🇳 (@SIDDHARTH23OCT) March 13, 2024
पुढे त्याने म्हंटले की, “बाकी तुम्हीच माझी संपूर्ण बॅग बघा. इंडिगो तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या सामानाची काळजी घेतली हे पाहून मला छान वाटलं.” हे सगळं सिद्धार्थ अतिशयोक्तीमध्ये या व्हिडीओद्वारे बोलत होता. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने संताप व्यक्त करत त्याने ट्वीट संबंधित विमान कंपनीला टॅग केले आहे. Siddharth Jadhav Video|
हेही वाचा:
अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दिल खुलं आव्हान म्हणाले,’त्यांनी महाराष्ट्राला सांगावं…’