शिक्रापूर – देशभरात आलेले करोनाचे संकट, त्यांनतर झालेले लॉकडाऊन आणि त्यामुळे बुडालेला रोजगार यामुळे असंख्य कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली असताना मात्र स्थानिक नेते आणि पुढारी गायब झालेले दिसत आहेत. गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी सामाजिक संस्था अन् कार्यकर्ते मात्र सरसावले आहेत.
शिक्रापूर व परिसरात काही युवकांनी एकत्र येत तब्बल दोन टन धान्य व किराणा माल वाटप केला आहे. पुढील चार महिन्यांवर स्थानिक ग्रामपंचायतच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ग्रामपंचायत सदस्य व इच्छुक उमेदवारांनी ग्रामस्थांना वेळ देत गरजूंना मदतीचा हात देणे गरजेचे आहे; मात्र याबाबत उलट दिसून येत आहे.
शिक्रापूरसारख्या मोठ्या गावामध्ये 17 ग्रामपंचायत सदस्य तसेच काही पक्षांचे मोठे आजी-माजी नेते असताना कोणीही इच्छुक गावातील गरिबांना मदत करण्यासाठी अथवा गरजूंचे अश्रू पुसण्यासाठी आणि गरजूंना मदतीचा हात पुढे करून त्यांना मदत करण्यासाठी पुढे आलेले दिसत नाहीत