काटेवाडी (ता. बारामती) – काटेवाडी येथे आज शनिवार (दि. 6) सकाळी दहा वाजता काटेवाडी गावचे माजी सरपंच जगन्नाथ देवकाते यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ पताका ओढा येथील मारुती मंदिरामध्ये फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
यावेळी पताका ओढा येथून संपूर्ण गावांमध्ये रॅली काढून शेवटी श्री संत तुकाराम महाराज पालखी ओटा या ठिकाणी सांगता करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळासाहेब शिंदे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांनाच का मतदान करायचे याबाबत जनतेला माहिती देऊन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांनी आजपर्यंत समाजासाठी काय योगदान दिले आहे.
याचाही उलगडा करून जास्तीत जास्त मतदान बारामती लोकसभेच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांचे चिन्ह असलेले तुतारी घेतलेला माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून भरघोस मतांनी सुप्रिया सुळे यांना विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.