CHOCOLATE । चॉकलेट हे सर्वांना आवडते. भारतात कॅडबरी चॉकलेट खाणारे असंख्य लोक आहे. पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, या व्हिडिओमध्ये चॉकलेटवर अळी रेंगाळताना दिसत आहे.
Found a worm crawling in Cadbury chocolate purchased at Ratnadeep Metro Ameerpet today..
Is there a quality check for these near to expiry products? Who is responsible for public health hazards? @DairyMilkIn @ltmhyd @Ratnadeepretail @GHMCOnline @CommissionrGHMC pic.twitter.com/7piYCPixOx
— Robin Zaccheus (@RobinZaccheus) February 9, 2024
व्हायरल होणार हा व्हिडिओ हैदराबादमधील आहे. जिथे एका व्यक्तीने 45 रुपयांचे कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेट विकत घेतले. त्याने चॉकलेटचे रॅपर उघडले असता त्यात एक अळी रेंगाळताना दिसली. या व्यक्तीने अमीरपेट मेट्रो स्टेशन येथील रत्नदीप रिटेल स्टोअरमधून हे चॉकलेट खरेदी केले होते. रॉबिन झॅकियास नावाच्या व्यक्तीने X (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्या चॉकलेटचे बिल देखील जोडले आहे ज्यासाठी त्याने 45 रुपये दिले होते.
हेही वाचा
Nitin Gadkari । टोलनाके, फास्ट टॅग होणार बंद; नितीन गडकरी लवकरच आणणार ‘जीपीएस आधारित टोल यंत्रणा’
चॉकलेटमध्ये अळी सापडल्यानंतर त्या व्यक्तीने त्या चॉकलेटचा व्हिडिओ बनवला आणि तो X या मायक्रोब्लॉगिंग साइटवर रॉबिन जॅकिअस नावाच्या अकाऊंटवरून शेअर केला. यासोबतच त्याने ज्या दुकानातून डेअरी मिल्क चॉकलेट खरेदी केले होते.
त्या दुकानाच्या बिलाचा फोटोही शेअर केला. पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले,’आज रत्नदीप मेट्रो अमीरपेट येथे खरेदी केलेल्या कॅडबरी चॉकलेटमध्ये अळी रेंगाळताना आढळून आली. या उत्पादनांची गुणवत्ता तपासली जाते का? सार्वजनिक आरोग्याच्या धोक्यासाठी जबाबदार कोण?” Robin Zaccheus ने ही पोस्ट 9 फेब्रुवारीला म्हणजेच गेल्या शुक्रवारी शेअर केली. त्यानंतर त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.
लोकांनी कंपनीवर खटला दाखल करण्याचा सल्ला…
पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, लोकांनी रॉबिन झॅकियसला कॅडबरी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले. एका यूजरने लिहिले की, “कॅडबरी टीमकडे तक्रार करा, ते नमुने गोळा करण्यासाठी आणि चाचणी करण्यासाठी येतील.”
कॅडबरीने पोस्टाला दिले उत्तर
ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेनेही जॅकेयसच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले,’संबंधित अन्न सुरक्षा टीम @AFCGHMC ला या समस्येवर अलर्ट केले गेले आहे आणि ते शक्य तितक्या लवकर सोडवले जाईल.’
हेही वाचा
AIMIM leader Asaduddin Owaisi । “मी प्रभू रामाचा आदर करतो पण…”