AIMIM leader Asaduddin Owaisi । ‘श्री राम मंदिराचे बांधकाम आणि श्री राम लला यांचा अभिषेक’ या विषयावर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आपली भूमिका लोकसभे मांडली. ‘मला मर्यादा पुरुषोत्तम राम यांचा आदर आहे, पण नथुराम गोडसेचा आदर नाही.’ मी नथुराम गोडसेचा तिरस्कार करतो. ज्याच्या तोंडून शेवटच्या क्षणातही ‘हे राम’ निघाले त्यांच्यावर गोडसेने गोळ्या घातल्या
असदुद्दीन ओवेसी यांनी यांनी लोकसभेत दावा केला की,’बाबरी मशीद होती, आहे आणि कायम राहील.” तसेच आपण बाबर, जिना आणि औरंगजेब यांचे प्रवक्ते नसल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा
Nitin Gadkari । टोलनाके, फास्ट टॅग होणार बंद; नितीन गडकरी लवकरच आणणार ‘जीपीएस आधारित टोल यंत्रणा’
माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ जाहीर झाल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ते पुढे म्हणाले,’न्याय जिवंत आहे की अत्याचार कायम आहे हे दिसून येते.’
‘मोदी सरकार हे एका धर्माचे सरकार आहे की सर्व धर्मांचे पालन करणाऱ्या लोकांचे सरकार आहे? हे सरकार केवळ हिंदुत्वाच्या दृष्टीकोनावर आधारित आहे का ?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. माझा विश्वास मला सांगतो की बाबरी मशीद होती, आहे आणि राहील. बाबरी मशीद जिंदाबाद, भारत झिंदाबाद, जय हिंद.” राम मंदिराच्या मुद्द्यावर ‘तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांचे’ मौन ही त्यांची संमती असल्याचे ओवेसी म्हणाले.
हेही वाचा :
Maharashtra weather update। राज्यात मराठवाड्यासह विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा