Chirag -Satwiksairaj break Saina Nehwal’s record : भारताची स्टार बॅडमिंटनपटूंची जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांची यशस्वी घौडदौड सुरूच आहे. आता या भारतीय जोडीने आणखी एका यशाला गवसणी घातली असून त्यांनी लंडन 2012 ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालचा विक्रम मोडीत काढला आहे.
सलग 10 आठवडे पुरूष दुहेरीत जागतिक क्रमवारीत नंबर 1 राहिल्यानंतर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी ( Chirag Shetty-Satwiksairaj Rankireddy ) यांनी एक नवा विक्रम रचला आहे. चिराग आणि सात्विकसाईराज यांची जोडी पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे आणि त्यांनी अव्वल क्रमांकावर गेले 10 आठवडे आपले स्थान टिकवून ठेवले आहे. ‘ब्रदर्स ऑफ डिस्ट्रक्शन’पेक्षा BWF क्रमवारीत अव्वल स्थानावर इतर कोणत्याही भारतीय बॅडमिंटनपटूने जास्त वेळ घालवला नाही.
सायना नेहवाल हिने भारतीय बॅडमिंटनपटू म्हणून सर्वाधिक आठवडे जागतिक क्रमवारीत क्रमांक 1 वर राहण्याचा यापूर्वीचा विक्रम केला होता. तिने 18 ऑगस्ट 2015 रोजी बॅडमिंटनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि 21 ऑक्टोबर 2015 पर्यंत एकूण नऊ आठवडे ती शीर्षस्थानी राहिली होती.
🔟 weeks, 2️⃣ champs, 1️⃣ legacy!
Satwik-Chirag cement their place in history with a 10-week streak at the top 😎🔥@satwiksairaj | @Shettychirag04
📸: @badmintonphoto #IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/hj2HvOaIsx
— BAI Media (@BAI_Media) March 28, 2024
आशियाई क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन चिराग-सात्विक यांनी चीन मास्टर्स, मलेशिया ओपन आणि इंडिया ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर यावर्षी 23 जानेवारी रोजी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांनी मार्चमध्ये फ्रेंच ओपन जिंकून शीर्षस्थानी आपले स्थान आणखी मजबूत केले.
बॅडमिंटन रँकिंग सिस्टम मागील 52 आठवड्यांमध्ये खेळाडू/जोडीच्या 10 सर्वोत्कृष्ट स्कोअरिंग इव्हेंटच्या कामगिरीचा विचार करते. सध्या लीडरबोर्डवर चिराग आणि सात्विकचे 1,02,303 गुण आहेत. ते दुसऱ्या स्थानावर असलेल्या कांग मिन ह्युक आणि रिपब्लिक ऑफ कोरियाच्या सियो सेउंग जे यांच्यापेक्षा 5,000 पेक्षा अधिक गुणांनी पुढे आहेत.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, चिराग-सात्विक ही इतिहासातील पहिली भारतीय दुहेरी जोडी बनली जी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आली. मात्र, ते केवळ तीन आठवडे या स्थानावर राहिले. पुरुष एकेरीत, किदाम्बी श्रीकांत एप्रिल 2018 मध्ये क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला होता परंतु केवळ एक आठवडा अव्वल स्थानावर राहिला.
IPL (2008 – 2024) : आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे Top-10 फलंदाज, पाहा यादी…
दरम्यान, 1980 मध्ये ऑल इंग्लंड ओपनचे विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले दिग्गज प्रकाश पदुकोण हे त्यावेळी जागतिक क्रमवारीत 1 क्रमांकाचे खेळाडू मानले जात होते, परंतु बॅडमिंटनमधील संगणकीकृत रँकिंग पॉइंट सिस्टम खूप नंतर सुरू करण्यात आली.