Raghav Chadha । Preet Kaur – आम आदमी पार्टीचा सध्या वाईट काळ सुरू असल्याचे सूचित करणाऱ्या घटना घडत आहेत. एकीकडे तीन प्रमुख नेत्यांनंतर स्वत: पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल तुरूंगात आहेत. तर गेल्या काही काळात आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय चेहरा म्हणा किंवा आपचा चेहरा म्हणून अनेक राज्यांत ओळख निर्माण करणारे राघव चढ्ढा केजरीवालांच्या अटकेच्या कारवाईच्या वेळी या सगळ्या पिक्चरमधून गायबच होते.
मध्यंतरी राज्यसभेत त्यांच्या निलंबनाची कारवाई झाली होती. ते प्रकरण मिटल्यानंतर चढ्ढा फारसे चर्चेत नव्हते. केजरीवालांच्या अटकेनंतरही गेला आठवडाभर आतिशी, सौरभ भारद्वाज आणि आता केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता रोज माध्यमांमध्ये दिसत आहेत.
मात्र राघव चढ्ढा त्यात कुठेच नाही अशी चर्चा सुरू झाल्यावर राघव पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. मात्र अशा बातमीमुळे ते समोर आले आहे की त्यामुळे आपची भारतात डोकेदुखीच वाढण्याची शक्यता अधिक आहे. । Raghav Chadha । Preet Kaur ।
राघव चढ्ढा यांनी ब्रिटनच्या एका महिला खासदाराची भेट घेतल्यामुळे वाद होणार आहे. काही दिवसांपूर्वी राघव यांनी लंडनमध्ये तेथील संसद सदस्य प्रीत कौर गील यांची भेट घेतली होती. स्वत: गील यांनी या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली आहेत. राघव चढ्ढा यांना भेटून खूप छान वाटले आणि आम्ही दोघांनी जागतिक आरोग्य सुरक्षेच्या विषयावर चर्चा केल्याचे गील यांनी म्हटले आहे.
आता या भेटीवरूनच सगळा गदारोळ आहे. कारण प्रीत कौर गील यांची राजकीय कुंडलीच अशी आहे की त्यांना अडचणीत आणण्याचे काम ती करते. भारताच्या संदर्भात त्यांच्या मनात काही विशिष्ट समज आहेत व वेळोवेळी त्यांच्या विधानांतून ते डोकावत असतात.
खलिस्तानच्या समर्थनार्थ बोलणे, भारत सरकारच्या धोरणांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, तसेच भारताला राजकीय स्वरूपाचे नुकसान भोगावे लागू शकेल अशी सर्व विधाने करणे अशी प्रीत कौर गील यांची सवय आहे. त्यांचा हा इतिहास इंटरनेटवर आहे आणि अर्थातच भारतीय जनता पार्टीलाही तो माहिती असणार.
त्यामुळेच राघव यांनी प्रीत यांची घेतलेली ही भेट लगेचच मोठा राजकीय मुद्दा होऊ पाहते आहे. प्रीत जाहीरपणे विभाजनवादाचे समर्थन करतात, खलिस्तानवाद्यांसाठी निधी गोळा करण्याचे काम करतात. ब्रिटनमध्ये इंडिया हाउसच्या बाहेर केल्या जाणाऱ्या हिंसक निदर्शनांसाठी पैसा गोळा करतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जाहीरपणे घोषणाबाजी करतात याकडे लक्ष वेधत भाजपने या भेटीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रीत कौर यांचा जन्म जरी इंग्लंडच्या बर्मिंघम येथील असला तरी त्यांचे पिता दलजित सिंग हे भारतातील पंजाबचे आहेत. १९६० मध्ये त्यांच्या कुटुंबाने भारतातून ब्रिटनमध्ये पलायन केले. सध्या प्रीत कौर तेथील लेबर पार्टीच्या नेत्या आहेत व आरोग्य खात्याच्या मंत्रीही आहेत. । Raghav Chadha । Preet Kaur ।