Sharad Pawar | Dilip Walse Patil | Phone Call : ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे राहत्या घरात पाय घसरून पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. ते आता पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून पुढील काही काळ त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
अश्यातच आता शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधत प्रकृतीची विचारणा केली. दिलीप वळसे पाटील हे 27 मार्च 2024 रोजी रात्री 11.45 वाजता त्यांच्या घरात पाय घसरून पडले होते. त्यामुळं वळसे पाटील यांच्या खुब्याला मार आणि हाथ फ्रॅक्चर झाला होता.
शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्याशी फोनवरुन संवाद साधला अशी माहिती आहे. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी देखील दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला आहे.
शिवाजीराव आढळरावांना प्रचार कोण करणार? Sharad Pawar | Dilip Walse Patil | Phone Call
ऐन लोकसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागल्याने त्यांना किमान दोन महिने तरी विश्रांतीची गरज असणार आहे. त्यामुळे आता शिवाजीराव आढळराव यांचा प्रचार आणि आंबेगाव मधील प्रचार कोण करणार हा प्रश्न उपस्थित झालाय. दिलीप वळसे पाटील यांना अपघात झाल्याने त्याचा सर्वात मोठा फटका आढळरावांना बसणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट तरीही संवाद सुरु – Sharad Pawar | Dilip Walse Patil | Phone Call
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 जुलै 2023 रोजी फूट पडली त्यावेळी शरद पवार यांचे मानसपूत्र म्हटले जाणारे दिलीप वळसे पाटील अजित पवारांसोबत गेले होते. अजित पवारांसोबत गेलेलेअनेक नेते शरद पवारांना भेटणं टाळतात.
मात्र, दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकांच्या निमित्तानं आमने सामने येत असतं. राष्ट्रवादीतील फुटीनंतरही दिलीप वळसे पाटील शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं पुण्यात मोदीबागेत गेले होते. । Sharad Pawar | Dilip Walse Patil | Phone Call