टोकियो – भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने येथे सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तसेच महिला दुहेरीत भारताच्या ट्रीसा जॉली व गायंत्री गोपीचंद जोडीनेही विजयी वाटचाल कायम राखली.
सायनाने हॉंगकॉंगच्या चेउंग लेआन ली हीच्यावर अवघ्या 38 मिनिटांत 21-19, 21-9 अशी सरळ दोन गेममध्ये मात केली. यंदाच्या मोसमात सातत्याने अपयश तसेच दुखापतींचा सामना केलेल्या सायनाची या स्पर्धेतील सुरुवात आश्वासक झाली आहे.
महिला दुहेरीत भारताच्या ट्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी मलेशियाच्या यीन युआन लोऊ व वेलेरी सीओ जोडीचा 21-11, 21-13 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत मात्र, भारताच्या व्यंकट गौरव व जुही देवांगन जोडीला इंग्लंडच्या ग्रेगरी माइर्स व जेनी मुर जोडीकडून 21-10, 23-21 असा पराभव पत्करावा लागला.