Fastest 50 in IPL History (2008 – 2024) : जगप्रसिद्ध टी 20 लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या 17 वा सीजनची दणक्यात सुरूवात झाली आहे. आयपीएल 2024 चा10 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सीजनमध्ये प्रेक्षकांना गेल्या 9 सामन्यात एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत.
आयपीएल 2024 च्या हैदराबाद-मुंबई यांच्यातील आठव्या सामन्यात दोन्ही संघातील एकूण 4 फलंदाजांनी पन्नास धावांचा टप्पा ओलांडला. त्यापैकी या सामन्यात हैदराबादचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावले. मात्र काही मिनिटांनंतरच हैदराबादचाच युवा फलंदाज अभिषेक शर्माने हेडला मागे टाकत अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावले. तेव्हा यानिमित्ताने आपण IPL च्या इतिहासात आतापर्यंत सर्वात जलद अर्धशतक ठोकणाऱ्या Top-10 फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत.
10. Kieron Pollard : आयपीएल इतिहासात किरॉन पोलार्ड (2016 आणि 202)1, ख्रिस गेल (2013), सुनील नरेन (2018), हार्दिक पांड्या (2019), ॲडम गिलख्रिस्ट (2009), इशान किशन (2018), ख्रिस मॉरिस (2016), निकोलस पूरन (2020) या फलंदाजांनी 17 चेंडूत अर्धशतक झळकावत IPL च्या इतिहासात आतापर्यंत सर्वात जलद अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दहावे स्थान मिळवले आहे.
9. Abhishek Sharma : आयपीएल 2024 च्या हैदराबाद-मुंबई यांच्यातील आठव्या सामन्यात हैदराबादचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने 16 चेंडूत अर्धशतक झळकावले.
8. Ishan Kishan : इशान किशन याने आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरूध्द 16 चेंडूत 50 धावा लगावल्या होत्या.
7. Suresh Raina : सीएसकेच्या सुरेश रैनाने आयपीएल 2014 मध्ये पंजाब विरुद्ध 16 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
6. Nicholas Pooran : लखनौ सुपरजायंट्सच्या निकोलस पुरननेही गेल्या वर्षी (IPL 2023) आरसीबीविरुद्ध 15 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
IPL 2024 : भारतीय खेळाडूही घेणार आयपीएलमधून ब्रेक, समोर आलं ‘हे’ मोठं कारण….
5. Yusuf Pathan : केकेआरकडून खेळताना युसूफ पठाणने 2014 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 15 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
4. Sunil Narine : केकेआरच्या सुनील नरेनने 2017 मध्ये आरसीबीविरुद्ध 15 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या होत्या.
3. KL Rahul : केएल राहुलनेही 14 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. 2018 मध्ये त्याने दिल्लीविरुद्ध हा पराक्रम केला होता
2. Pat Cummins : पॅट कमिन्सने 2022 मध्ये केकेआरकडून खेळताना 14 चेंडूत अर्धशतक केले होते.
1. Yashasvi Jaiswal : IPL मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे, ज्याने 2023 मध्ये KKR विरुद्ध 13 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.