बीजिंग – “चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर’च्या माध्यामातून ग्वादर, गीलगीट- बाल्टीस्तानवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातो आहे. जागतिक श्रेणीवरील युद्ध विश्लेषक रोलांड जॅक्वार्ड यांनी एका लेखाद्वारे ही शक्यता वर्तवली आहे.
“सीपीईसी’च्या माध्यमातून केल्या जात असलेल्या प्रकल्पांवर चीन अब्जावधी डॉलर खर्च करत आहे. अरबी समुद्रातील ग्वादर बंदरामुळे चीनला जागतिक पातळीवर उर्जाविषयक व्यवहारांसाठी मुक्त प्रवेश मिळणार आहे. या बंदराच्या माध्यमातून चीन पश्चिम आशियातील सागरी वाहतूकीवर आपले नियंत्रण आणण्याची शक्यता आहे.
तसेच गीलगीट – बाल्टिस्तान प्रांतावरही चीन आपले नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पाक व्याप्त काश्मीरमधील गीलगीट बाल्टिस्तान हा प्रांत चीनच्या शिन्जियांग प्रांताला लागूनच आहे. 2010 मध्ये अनेक चीनी सैनिक या प्रदेशात रस्ते सुरक्षित करण्यासाठी आणि या भागामध्ये “सीपीईसी’च्या माध्यमातून बांधल्या जात असलेल्या सुमारे दोन डझन बोगदे आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यासाठी उपस्थित होते, असे मानले जात होते.
चीनचे संभाव्य आक्रमण गृहित धरून तैवानचा सर्वात मोठा युद्धसराव
त्यामुळे या भागावर चीनचे थेट नियंत्रण सहज शक्य आहे. ग्वादर बंदरावरील नियंत्रणामुळे चीनला बाह्य नियंत्रण मिळणार असून गीलगीट-बाल्टिस्तानवरील नियंत्रणामुळे चीनला अंतर्गत सुरक्षा मिळणार आहे, असे निरीक्षण जॅक्वार्ड यांनी नोंदवले आहे.
दिवाळखोरीतून वाचण्यासाठी पाकिस्तानची धडपड; सरकारी कंपन्या, मालमत्ता विकण्याचा निर्णय