तैपेई – चीनचे संभाव्य आक्रमण गृहित धरून तैवानने आपला सर्वात मोठा युद्ध सराव सुरू केला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाप्रमाणे जर चीनने तैवानवर हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी म्हणून हा युद्धसराव करण्यात येतो आहे. तैवान हा चीनचाच भाग असल्याचा दावा चीनकडून सातत्याने केला जातो आहे. जर आवश्यकता भासल्यास तैवानचा ताबा घेण्यासाठी बळाचा वापर केला जाईल, अशी धमकीही चीनकडून नेहमीच दिली जात असते.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळेच चीनदेखील तशाप्रकारे तैवानवर हल्ला करण्याची भीती तैवानला वाटते आहे. त्यामुळेच चीनकडून असलेल्या धोक्याचा विचार करून तैवानने हा युद्धसराव सुरू केला आहे. जर चीनने युद्ध सुरू केले तर ज्या प्रकारचे आक्रमण केले जाईल, त्याचा विचार करूनच “हान कुआंग’ या युद्धसरावाची आखणी केली गेलेली आहे.
सागरी मार्गाने होणारे चीनचे आक्रमण थोपवण्यासाठी आणि राजधानी तैपेईला वाचवण्यासाठी संभाव्य युद्धनितीनुसार या युद्धसरावात डावपेच केले गेले आहेत. सैन्याच्या बचावासाठी भूमिगत बंकरदेखील तयार केले गेले आहेत आणि शत्रूपासून वाचण्यासाठीची तयारीदेखील केली गेली आहे.
दिवाळखोरीतून वाचण्यासाठी पाकिस्तानची धडपड; सरकारी कंपन्या, मालमत्ता विकण्याचा निर्णय
लढाऊ विमानांचा सामना करण्यासाठी स्टिंगर क्षेपणास्त्रेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. ही क्षेपणास्त्रे समुद्रकिनाऱ्याजवळच्या उंच इमारतींवर तैनात करण्यात आली असल्याचे “तैवान इन्सटिट्युट फॉर सिक्युरीटी ऍन्ड रिसर्च’च्या संरक्षण तज्ज्ञांनी सांगितले. गेल्या वशर्षभरात चीनकडून 969 वेळा तैवानच्या हवाई संरक्षण हद्दीचे उल्लंघन केले होते. तर 2020 मध्ये हेच प्रमाण 380 इतके कमी होते.
मध्य प्रदेशात आता इंग्रजीसोबतच हिंदीतूनही घेता येणार वैद्यकीय शिक्षण