देशातील आर्थिक मंदी लपवण्यासाठी ‘चांद्रयान २’ मोहिमेचा वापर – ममता बॅनर्जी

कोलकाता – चांद्रयान-२ या भारताच्या महत्वाकांक्षी मोहिमेसंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारवर टीका केली आहे. देशातील आर्थिक मंदीच्या स्थितीवरुन जनतेचे लक्ष हटवण्यासाठी सरकार चांद्रयान-२चा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.

कोलकात्यातील राज्य विधानसभेत बोलताना त्या म्हणाल्या की  “केंद्रातील मोदी सरकार चांद्रयान-२चा प्रचार अशा पद्धतीने करत आहे, की यापूर्वी भारताने कधी कोणत्याही अंतराळ मोहिमेचे नेतृत्वच केले नाही. उलट देशात निर्माण झालेले आर्थिक संकट लपवण्यासाठी केंद्र सरकार चांद्रयान-२ मोहिमेचा वापर करीत आहे.”

आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक झाली यावरही त्यांनी भाष्य केले आहे. यासंदर्भात त्या म्हणाल्या की “या प्रकरणात कायदा आपले काम करेल मात्र, भाजप सरकारला त्यांच्याप्रती सन्मान दाखवणे गरजेचे होते.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.