Dalai Lama : मंगोलियातील आठ वर्षांचा मुलगा चीनसाठी डोळ्यात खुपत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र आहे. चीनच्या नजरेत हे मुलं इतकं खुपत आहे की, या निष्पाप मुलाला चीनला कोणत्याही किंमतीत आपल्या ताब्यात घ्यायचे आहे. या मुलाचा पुनर्जन्म झाल्याची चर्चाही चांगलीच रंगली आहे. तिबेटी बौद्ध धर्माचे तिसरे महान धार्मिक नेते 10 व्या खलखा जेत्सून धम्पा रिनपोचे यांचा पुनर्जन्म झाला असून हा मुलगा ते असल्याची चर्चा आहे.
किंबहुना बौद्ध धर्माचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांनीच या बालकाला हा दर्जा दिला. ए अल्तान्नार असे या मुलाचे नाव असून त्याचे वय आठ वर्षे आहे. आता हा मुलगा दलाई लामा आणि पंचेन लामा यांच्यानंतर बौद्ध धर्माचे तिसरे मोठे धार्मिक नेते बनले आहे. उल्लेखनीय आहे की बौद्ध धर्मात धार्मिक नेत्यांच्या पुनर्जन्माला विशेष महत्त्व आहे. अशात भारतातील हिमाचल प्रदेशमध्ये ए.अल्तान्नार यांना तिबेटी धर्मगुरू म्हणून मान्यता देण्यासाठी एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे चीनचे आणखीनच टेन्शन वाढले आहे. हिमाचल हेच ठिकाण आहे जिथे ८७ वर्षीय दलाई लामा निर्वासित राहतात. तिबेटचे निर्वासित सरकारही याच ठिकाणाहून काम करते.
या मुलाचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ए. अल्तानारचा जन्म एका समृद्ध कुटुंबात झाला होता, त्यामुळे इतक्या लहान वयात तो तिबेटी धार्मिक नेत्याच्या मार्गावर जाईल असे कोणालाही वाटले नव्हते. या मुलाला बौद्ध धर्माच्या अध्यात्मिक नेत्याचा पुनर्जन्म म्हणून ओळखण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे चीन संतापला आहे.
चीन सरकारने आदेश जारी केला होता
उल्लेखनीय आहे की, 2007 मध्ये चीन सरकारने एक आदेश जारी केला होता की बौद्ध लामांना निवडण्याचा अधिकार फक्त कम्युनिस्ट पक्षाला आहे. चीनबाहेरील कोणतीही व्यक्ती किंवा गट त्यावर प्रभाव टाकू शकत नाही. अशात दलाई लामांच्या या निर्णयामुळे संतप्त झालेला चीन आपल्या देशावर काही कठोर कारवाई करू शकतो, अशी भीती मंगोलियन लोकांना वाटत आहे.
या मुलाची निवड कशी झाली?
या मुलाला इतर काही मुलांसोबत मंगोलियाची राजधानी उलानबाटार येथील एका विशाल मठात नेण्यात आले होते, जिथे मुलांना धार्मिक वस्तूंनी भरलेले टेबल दाखवले होते. यासोबतच मुलांचे लक्ष वळवण्यासाठी इतरही वस्तू तिथे ठेवण्यात आल्या होत्या. ज्यात सर्व मुलांचे लक्ष विचलित झाले पण अल्तनार यांचे लक्ष विचलित झाले नाही. त्यांनी विखुरलेल्या धार्मिक वस्तूंची दुरुस्ती सुरू केली.