मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करू माहिती दिली आहे. अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेते त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दादा, तुम्ही लवकर बरे व्हा असे ट्विट करत सदिच्छा व्यक्त केली आहे.
‘दादा, स्वत:ची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा!’, असे ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
.@AjitPawarSpeaks दादा, स्वत:ची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा! https://t.co/d99IlRWd0s
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 26, 2020
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे यांनीही ट्विट करून सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.