पुरग्रस्तांना मदत करणाऱ्या सर्वांचे मानले आभार
मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह देशभरात पहायला मिळत आहे. दरम्यान, दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजवंदन केले. तर इकडे मुंबईतील मंत्रालयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केले. सुरूवातीला त्यांनी मंत्रालयातील राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
CM @Dev_Fadnavis hoisted the National Flag at Mantralaya, Mumbai in presence of many dignitaries on #IndependenceDay ! #IndiaIndependenceDay pic.twitter.com/VrvPdR1Nh0
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 15, 2019
दरम्यान, ध्वजारोहणानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्यातील पुरपरिस्थितीत राज्य सरकार, स्वयंसेवी संघटना आणि विशेष करून भारतीय लष्कराने केलेल्या मदतीचे आभार व्यक्त केले. राज्याला पुराच्या नैसर्गिक आपत्तीतून ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी आभार व्यक्त केले.
CM Devendra Fadnavis hoisted the National Flag at his Varsha residence this morning on #IndiaIndependenceDay !
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या ‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजारोहण केले. pic.twitter.com/AAVgm2qENo— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 15, 2019
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानीदेखील आज सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कुटूंबियांसह अनेक जण उपस्थित होते.