मुंबई – आता रेशन दुकानात अन्नधान्यांबरोबरच स्वस्त दरात चिकन, मटण, अंडी आणि मासे सारख्या प्रोटीनयुक्त वस्तू देखील स्वस्त दरात मिळणार आहेत. अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार करून आता पोषण सुरक्षेला सरकार प्राधान्य देणार आहे. देशातील गरीब नागरिकांचा पोषण आहार सहज आणि कमी किंमतीत उपलब्ध व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. ही योजना 1 एप्रिल 2020 पासून लागू होण्याची शक्यता आहे.
सध्या रेशन दुकानांवर गहू, तांदूळ, कडधान्ये, साखर, तेल या वस्तू सवलतीच्या दरात मिळतात. अन्नधान्य अनुदानापोटी सरकारला मोठी तरतुद करावी लागते. या रेशन दुकानांवर आता पोषणयुक्त पदार्थ देण्याचा सरकारचा विचार आहे. सुरवातीच्या टप्प्यात किमान एक ते दोन प्रोटीनयुक्त पदार्थ रेशन दुकानावर उपलब्ध केले जातील. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.