मुंबई – बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपटांचा बोलबाला आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त,शेर शिवराज,पावनखिंड अशा ब्लॉकबस्टर ऐतिहासिक चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे आणखी एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येताहेत. मात्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती नसून छत्रपती संभाजी महाराजांवर आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी नुकतंच आपल्या आगामी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचे चित्रकरनं पूर्ण केले. या चित्रपटातून धर्मवीर संभाजी महाराजांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मल्हार पिक्चरची ही पहिलीच कलाकृती असणार आहे.
या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या संपूर्ण टीमसह केक कापून आनंद साजरा केला. याची माहिती देत लांजेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ते म्हणतात,”चित्रीकरण पूर्ण.. माझी कलारुपी सेवा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती शंभू राजांच्या चरणी सुद्धा मी अर्पण करू शकलो याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. छत्रपती शंभू राजांच्या पराक्रमावर आधारित ‘शिवरायांचा छावा‘ ही चित्रकृती तरुणांना नक्कीच प्रेरणा देईल.जय शिवराय..जय शंभुराजे..”
View this post on Instagram
‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. चित्रपटाच्या कास्टिंगबाबत तसेच रिलीजबाबत अद्याप कोणताही घोषणा करण्यात आलेली नाही.