मुंबई – अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने (Mrunmayee Deshpande) आपल्या अभिनयाच्या जोरावर एकापेक्षा एक असे दर्जेदार चित्रपट आजपर्यंत केले आहेत. अनेक ऐतिहासिक चित्रपटात देखील तिने काम केले आहे. कोणतीही भूमिका ती उत्तमरित्या निभावते. चित्रपटांसह ती काही टीव्ही शोद्वारे सूत्रसंचालन करतानाही दिसते. याशिवाय मृण्मयी सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला.
मृण्मयी देशपांडे मुंबई डायरी या सीरिजमध्ये झळकणार आहे. सध्या या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे. या सीरिजच्या निमित्ताने तिने एक फोटोशूट केलं. या फोटोमध्ये ती स्टायलिश अंदाजात दिसून येत आहे. मृण्मयीने Waves Hemp ब्लेझर आणि पँट परिधान केली आहे. तिचा हा लूक आणि खासकरुन तिचं हे ब्लेझर जास्त चर्चेत येत आहे. या लुकमध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा लुक चाहत्यांच्या देखील चांगलाच पसंतीस पडला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, नाटकांमधून आपल्या अभिनयाला सुरुवात केलेली मृण्मयी कुंकू,अग्निहोत्र अशा मालिकांमधून घराघरात पोहचली. ‘नटसम्राट’ स्लॅमबूक अशा दमदार चित्रपटांमध्ये काम करून तिने सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख बनवली आहे. यानंतर आता मृण्मयी चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी आणि अजय पूरकर अभिनीत दिग्पाल लांजेकर यांच्या ‘सुभेदार’ चित्रपटात पाहायला मिळाली होती.
या चित्रपटात मृण्मयीने एका गुप्त सैनिकाची भूमिका साकारली होती. ‘सुभेदार’ सह मृण्मयी देशपांडेने ‘शेर शिवराज’, ‘फर्जंद’ आणि फत्तेशिकस्त’ या चित्रपटात अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.