Rahul Dev : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाबाबत एक माहिती समोर आली आहे. ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिक चित्रपटात हिंदी सिनेइंडस्ट्रीतला अभिनेता राहुल देव याची एंट्री झाली आहे. राहुल देव याने अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारली आहे. त्यानंतर आता राहुल देव ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात काकर खान ही निगेटिव्ह भूमिका साकारणार आहे.
या भूमिकेबाबत राहुल देव म्हणाला की, “आजवरच्या अभिनय कारकिर्दीत अनेक खलनायकी भूमिका साकारल्या असल्या तरी काकर खान ही ऐतिहासिक भूमिका करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. . काकरखान खानची भूमिका असल्याने उर्दू भाषा आत्मसात करणे मला गरजेचे होते. प्रत्येक भाषेचा स्वत:चा असा लहेजा असतो, तो लहेजा लक्षात घेत ही भाषा मी शिकून घेतली. तसेच देहबोलीही तितकीच बोलकी असण्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर होती. ती मी माझ्या अभिनयातून केली.”
View this post on Instagram
औरंगजेबाने बुऱ्हाणपूरची पूर्ण जबाबदारी काकर खान या अनुभवी सरदारावर सोपविली होती. लोकांवर जिझिया कर लावत काकर खानने जनतेस वेठीस धरले होते. काकरखानच्या अन्यायी राजवटीपासून छत्रपती संभाजी महाराजांनी रयतेची सुटका केली होती. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहे. येत्या 16 फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.