Digpal lanjekar : ‘सुभेदार’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ आणि ‘फत्तेशिकस्त’ यांसारख्या भव्य ऐतिहासिक सिनेमांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणखी नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर उलघडणार आहे. नुकतेच ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आले आहे. या दमदार पोस्टरने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर कोण साकारणार याची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टरवर घनदाट जंगल, डरकाळी फोडणार वाघ आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता दिसत आहे. यात तो पाठमोरा असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप त्याचा चेहरा समोर आलेला नाही.
View this post on Instagram
या पोस्टरला दिग्पाल लांजेकरांनी हटके कॅप्शन दिले आहे. “वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात… ‘शिवरायांचा छावा, 16 फेब्रुवारी 2024 पासून फक्त चित्रपटगृहात!,” असे दिग्पाल लांजेकरांनी या पोस्टरला कॅप्शन दिले आहे. चित्रपटाच्या पोस्टरसह या रिलीज डेट देखील सांगण्यात आली आहे. दरम्यान, ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ येत्या 16 फेब्रुवारी 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे.