Manoj Jarange Patil – मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज अंतरवाली सराटी गावात जाहीर सभा झाली. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठा बांधवाना आंतरवाली सराटी गावात येण्याचे आवाहन केले होते. या सभेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलतांना मनोज जरांगे यांनी सात कोटींचा आरोप करणाऱ्या अजित पवार गटातील छगन भुजबळांना मराठ्याच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे.
मनोज जरांगे ( Manoj Jarange Patil )म्हणाले,’ मी अजितदादा पवार यांना आवाहन करतो की, छगन भुजबळांना जरा समज द्या. नाहीतर ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही. मग मी सोडत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.’ असे म्हणत जरांगे पाटील यांनी भुजबळांवर टीका केली.
यावर आता छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतांना ‘मनोज जरांगे पाटील कुणाचं खातोय…’ असं म्हणत थेट निशाणा साधला आहे माध्यमांशी बोलतांना छगन भुजबळ पुढे म्हणाले,’राज्यात ओबीसी 54 टक्के पेक्षा जास्त आहेत. मराठा समाजाला वेगळं आणि टिकणारं आरक्षण द्या. मनोज जरांगे पाटील यांचं मी काय खाललं आहे हे त्यांनी सांगावं. आता मनोज जरांगे पाटील कुणाचं खातोय हे त्यांनी सांगावं, असं भुजबळ म्हणाले आहे.