Honor Magic Vs 2 : ज्यांना फोनमध्ये रॅम आणि स्टोअरेज जास्त हवे असेल त्यांच्यासाठी Honor ने आपला नवीन V सीरीज स्मार्टफोन Magic VS2 लॉन्च केला आहे. Honor Magic Vs 2 हा 2023 मध्ये लॉन्च होणारा कंपनीचा तिसरा फोल्डेबल फोन आहे. याआधी Honor Purse V आणि Honor Magic V2 लॉन्च करण्यात आले आहेत. नवीन Honor Magic Vs 2 हे गेल्या वर्षी (2022) लाँच करण्यात आलेले Magic Vs चे अपग्रेड व्हर्जन आहे. नवीन फोल्डेबल Honor फोनमध्ये 6.43 इंच बाह्य डिस्प्ले, 50MP प्रायमरी रिअर कॅमेरा यासारखी वैशिष्ट्ये आहेत. Honor च्या या नवीन फोनची किंमत आणि फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घ्या…
Honor Magic Vs 2 स्पेसिफिकेशन्स
Honor Magic V2 हा पुस्तक शैलीतील फोल्डेबल फोन आहे. Honor चा हा फोन आत्तापर्यंतचा सर्वात स्लिम फोल्डेबल फोन असल्याचे म्हटले जात आहे. फोल्ड केल्यानंतर, त्याची जाडी 10.7 मिमी आणि विस्तारित 5.1 मिमी असते. कंपनीचे म्हणणे आहे की, हँडसेटचे वजन 229 ग्रॅम आहे. डिव्हाइसच्या मागील बाजूस एक आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आहे जो किंचित वर आहे. फिंगरप्रिंट स्कॅनर हँडसेटच्या उजव्या बाजूला असलेल्या पॉवर बटणमध्ये एकत्रित केले आहे.
Honor Magic Vs 2 मध्ये 6.43-इंचाचा डिस्प्ले आहे जो (2,344 x 2,156 पिक्सेल) रिझोल्यूशन ऑफर करतो. स्क्रीन 2500 nits ची पीक ब्राइटनेस देते. फोनमध्ये 7.9 इंच अंतर्गत स्क्रीन आहे ज्याचे रिझोल्यूशन (2,376 x 1,060 पिक्सेल) आहे. हँडसेटमधील दोन्ही डिस्प्लेमध्ये AMOLED पॅनल्स, 120 Hz LTPO रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट आहे. स्क्रीनभोवती पातळ बेझल दिलेले आहेत.
Honor Magic V2 मध्ये 50MP प्राइमरी, 12MP अल्ट्रा-वाइड-एंगल आणि 40x डिजिटल झूमसह 20MP टेलिफोटो सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Honor Magic V2 मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen प्रोसेसर आहे. फोनमध्ये 16 GB रॅम आणि 512 GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. हँडसेटला 5000mAh बॅटरी प्रदान केली आहे हा फोन Android 13 आधारित MagicOS 7.2 सह येतो. फोनमध्ये 5G, ब्लूटूथ, वाय-फाय, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Honor Magic VS2 ग्लेशियर ब्लू, वेल्वेट ब्लॅक आणि कोरल पर्पल रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोनच्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत सुमारे 80,200 रुपयांपासून सुरू होते आणि 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत सुमारे 88,200 रुपयांपासून सुरू होते.