रत्नागिरी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरी येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत त्यांनी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसवर जोरदार टीका केली. विशेषत: त्यांनी आज अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली.
तसेच राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं नाही, असं राज ठाकरे म्हणाले. त्याला आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
राज ठाकरे यांनी फेब्रुवारी 2018 ला पुण्यातील बीएससीसी कॉलेजला मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा दाखला देत छगन भुजबळ म्हणाले,’मी 1991 पासून शरद पवारांसोबत आहे. अनेक वेळा पवारसाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतात. राज ठाकरे यांनी शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचही राज ठाकरेंनी हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी शरद पवार म्हणाले होते की, शिवाजी महाराज हे सर्वांचेच आहेत. ‘
छगन भौजबल पुढे म्हणाले,’छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती केली. सर्वांना सोबत घेतलं. पण शाहू, फुले, आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीत फार मोठं काम केलं. म्हणून पवारसाहेब म्हणाले की, या महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे महत्त्वाचे आहेत. दिल्लीत सगळेजण महाराष्ट्रातील नेत्यांना मराठा लीडर असं म्हणतात. याचा अर्थ महाराष्ट्रातील नेता असा होतो. असं उत्तर शरद पवारांनी दिलं होतं.’ असं भुजबळ म्हणाले आहे.