Chhagan Bhujbal on Jarange। आज सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मराठा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा अहवाल सुपूर्द करण्यात आला. राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर झाल्यानंतर आता हा अहवाल विशेष अधिवेशनात मांडण्यात येणारेय. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.यावरूनच आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री छगन भुजबळ यांनी आज थेट मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. ‘मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण जरांगे पाटील करत आहेत. मात्र मनोज जरांगे यांना आयोग, मसुदा नेमका किती कळतो?‘ असा थेट अन् खोचक सवाल छगन भुजबळ यांनी विचारला.आपण मुख्यमंत्र्यांची परिषद पहिली नाही मात्र माहिती घेतली.
मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या Chhagan Bhujbal on Jarange।
राज्यात १५ दिवसात १ कोटी ५८ लाख घरांचे सर्वेक्षण झाले हा खरंतर विक्रमच म्हणावा लागेल. असा वेग राहिला तर जातीय जनगणना लावरच राज्यातही पूर्ण होईल असे म्हणत सरकारला घरचा आहेर दिला. आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत की तुम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, आजही आमची तीच मागणी आहे.आमचा पाठिंबा आहे. वेगळं आरक्षण द्या. मात्र, त्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका हे आमचं म्हणणं आहे.
एका कुटुंबात 86 कुणबी प्रमाणपत्रं Chhagan Bhujbal on Jarange।
अनेक मराठा समाजाच्या लोकांना, त्यांची नोंद नसताना खोट्या नोंदी घेऊन कुणबी म्हणून त्यांना दाखले दिले जात आहेत. एका घरात तर 86 कुणबी प्रमाणपत्र दिले आहेत, त्यांनी फटाके उडवले. हे धक्कादायक आहे. कुणबीकरण थांबवा आता, जबरदस्तीने कुणबी करून टाकू नका, असे भुजबळ म्हणाले.
मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पण आजही मराठा समाज हा डॉमिनेटिंग आहे, रुलिंग कम्यनिटी आहे राज्याची. तो सामाजिकदृष्ट्या मागास कसा होईल ? असा सवाल भुजबळ यांनी विचारला. मागच्या पाच आयोगांनी मराठा समाज सामाजिक दृ्ष्ट्या मागास नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.