नवी दिल्ली – भारताचे अनुभवी बुद्धिबळपटू विदित गुजराथी आणि महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णी यांनी फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. ही स्पर्धा रशियातील सोची येथे येत्या 10 जुलैपासून खेळवली जाणार आहे.
विश्वकरंडकासाठी पात्र ठरणारा विदित हा भारताचा चौथा बुद्धिबळपटू ठरला आहे. यापूर्वी ग्रॅण्डमास्टर पी. हरिकृष्ण, अरविंद चिदम्बरम आणि पी. इनियान यांच्यासह नाशिकचा ग्रॅण्डमास्टर विदितसुद्धा या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
विदितने 2017 आणि 2019 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले होते. विदित जागतिक क्रमवारीत 23 व्या स्थानी आहे.
दरम्यान, भक्तीसह ग्रॅण्डमास्टर कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका, आर. वैशाली आणि पद्मिनी राऊत या महिला विश्वकरंडकासाठी पात्र ठरल्या आहेत. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या हम्पी हिने फिडे महिला कॅण्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे. सलग पाचव्यांदा ती या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.