हैदराबाद – भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासह मुलगा इझान आणि बहीण अनाम यांना ब्रिटनचा व्हिसा मंजूर झाला आहे. त्यामुळे विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत खेळण्याचा सानियाचा मार्ग सोपा झाला आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, क्रीडा मंत्रालय तसेच लंडन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय दूतावासाच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. त्यामुळे सानियाला टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी लंडनमधील काही स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळेल.
करोनाचा धोका कायम असल्याने परिस्थिती बिकट होत आहे. मात्र, आगामी स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना मी 100 टक्केयोगदान देण्याचा प्रयत्न करेन.
क्रीडामंत्री किरन रिजीजू, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि ब्रिटन सरकारच्या सहकार्यामुळे मला ऑलिम्पिकसाठी सराव करण्याची संधी मिळेल, असे सानियाने सांगितले.