Rahul Gandhi In Telangana : तेलंगणासह देशातील 5 राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील तेलंगणाच्या निवडणूक प्रचारासाठी तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांशी चर्चा केली. त्यातच त्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्यात ते पुन्हा एकदा शेफ बनल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील चोपदांडीतील प्रचारादरम्यान त्यांनी डोसा बनवण्यात प्रयत्न केला. त्याचा व्हिडिओ काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, “राहुल गांधीजींनी तेलंगणातील चोपदांडी येथे आमच्या प्रचारादरम्यान डोसा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक चौकाचौकात लोकांना वाटत आज कि राहुल जी त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावे.”
राहुल गांधींच्या या व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. यावर लोकही बिनधास्तपणे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत दुकानात पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. इथे ते दुकानदाराकडून डोसा कसा बनवायचा हे शिकत आहेत. दुकानदाराच्या सांगण्यावरून ते डोसा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.
During the election campaign in Telangana, Rahul Gandhi himself made Dosa and fed it to the family sitting there and later ate it himself pic.twitter.com/ql83A5wBo6
— Ashish Singh (@AshishSinghKiJi) October 20, 2023
राहुल गांधी तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पोहोचले आहेत. येथे ते सातत्याने जनसंपर्क करत आहेत. गुरुवारी त्यांनी सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समिती (BRS) आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास जात सर्वेक्षण करण्याचे आश्वासनही गांधी यांनी दिले आहे.
याशिवाय त्यांनी केसीआरवर स्वत:ला आणि कुटुंबाला समृद्ध करत असल्याचा आरोपही केला आहे. यावर केसीआर यांचे पुत्र केटी रामाराव (केटीआर) यांनीही पलटवार करत राहुल गांधींवर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला आहे.