मुंबई – अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या आऊटफिटमुळे नेहमीच चर्चेत असते. कधी जीममधून बाहेर पडताना तर कधी विविध कार्यक्रमांदरम्यान ती स्पॉट होत असते. सध्या मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिचा बोल्ड आऊटफिट पाहून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मलायकाला ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील तिला कपड्यांवरुन ट्रोल करण्यात आले आहे.
एका कार्यक्रमासाठी मलायका उपस्थित राहिली होती. यावेळी तिने खूपच बोल्ड असा ब्ल्यू शिमरी ड्रेस परिधान केला होता. मलायकाचा ड्रेस दिसायला ट्रान्सपरेंट होता त्यामुळेच तिला ट्रोल करण्यात आले आहे. तिचा हा लुक अनेकांच्या पसंतीस पडलेला नाही. यावरुन तिच्यावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. काहींनी तिची तुलना उर्फीसोबत केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहीले की, ‘फॅशनच्या नावाखाली आजकाल काहीही करतात.’ तर दुसऱ्याने लिहीले की, ‘माझा पडदा परत कर.’
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या हॉट आणि बोल्ड लुकमुळे अधिक करून ओळखली जाते. वयाच्या 49 व्या वर्षामध्ये देखील तिचे फिटनेस आणि सौंदर्य तरुणांना लाजवेल असे आहे. मलायका सोशल मीडियावर नेहमीच तिच्या हॉट अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो चाहत्यांच्या देखील चांगलेच पसंतीस पडत असल्याचे पाहायला मिळते.
अरबाज सोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जुनला मागील काही वर्षांपासून डेट करत आहे. अनेकांना त्यांची जोडीही आवडते. मात्र अद्याप त्यांनी लग्न केलेले नाही. चाहते देखील त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.