पिंपरी – सैराट चित्रपटातील अभिनेता आकाश ठोसर (परश्या) यांच्या नावाने बनावट फेसबूक अकाउंट तयार करून महिलेची फसवणूक केली. ही घटना ऑक्टोबर 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत घडली. याप्रकरणी अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
शिवदर्शन उर्फ शिवतेज नेताजी चव्हाण (वय 25, रा. मोहननगर, चिंचवड स्टेशन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चव्हाण हा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका दिवंगत माजी नगरसेवकाचा मुलगा आहे.
आरोपी चव्हाण याने अभिनेता आकाश ठोसर यांच्या नावाने बनावट फेसबूक अकाउंट तयार करुन अहमदनगर येथील एका महिलेसोबत मैत्री केली. तिच्याकडून एक लाख 40 हजार रुपयांचे दागिने परत करण्याच्या बोलीवर घेतले. आरोपी दागिने घेण्यासाठी नगरला गेला होता. तेव्हा त्याने मला आकाश ठोसर याने पाठवले असल्याचे सांगितले होते. दागिने परत न केल्याने महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.