फुटपाथवर सॅनिटायझरची विक्री नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

पिंपरी – करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझरची खरेदी केली. काही काळ तर तुटवडादेखील जाणवला. काहींनी जास्त किमतीमध्ये विक्री केली. परंतु आता मात्र हे सॅनिटायझर फुटपाथवरील फळविक्रेतेदेखील विकत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सॅनिटायझर हे औषध या प्रवर्गात मोडत असल्याने त्याची खरेदी नागरिकांनी मान्यताप्राप्त परवानाधारकांकडूनच करणे अपेक्षित आहे. तसे बिलदेखील घेणे जरुरीचे आहे. परंतु पिंपरी-चिंचवड शहरात मात्र बऱ्याच ठिकाणी किराणा दुकानदार, फळविक्रेते रस्त्यात, फुटपाथवर सॅनिटायझरची विक्री करताना दिसून येत आहेत.

नेवाळे वस्ती येथे एका फळविक्रेता फुटपाथवर स्टॉल लावून सॅनिटायझरची विक्री करत आहे. परंतु याकडे अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा ठिकाणावरून सॅनिटायझरची खरेदी करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न सर्वसामान्य जनता विचारत आहे. तेव्हा अन्न व औषध प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अशा पद्धतीने सॅनिटायझरची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना शासन करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.