संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आळंदीतील वाहतुकीत बदल

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांचे वाहन चालकांना आवाहन

पिंपरी – संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा सोहळा 18 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक भक्त देहू-आळंदी येथे येतात. या पार्श्‍वभूमीवर पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. हा बदल सोमवारी (दि. 18) सकाळी नऊ ते मंगळवारी (दि. 26) सोहळा संपेपर्यंत कायम असणार आहे.

आळंदी, देहूगाव, भंडारा डोंगर या परिसरात भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात. भाविकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू राहण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. अग्निशमन विभाग, पोलीस वाहने आणि रुग्णवाहिका यांना या बदलातून वगळण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिले आहेत.

वाहतुकीसाठी वळविलेले मार्ग – पर्यायी मार्ग
* पुणे – आळंदी रस्ता (दिघी मॅगझीन चौक येथे बंद) पर्यायी मार्ग – पुणे – दिघी मॅगझीन चौक – भोसरी – मोशी – चाकण
* मोशी – आळंदी रस्ता (डुडूळगाव जकात नाका येथे बंद) पर्यायी मार्ग – 1) मोशी – चाकण – शिक्रापूर 2) मोशी – भोसरी – मॅगझीन चौक – दिघी
* चाकण – आळंदी रस्ता (कारवा धर्मशाळा येथे बंद) पर्यायी मार्ग – 1) (पुण्याकडे जाण्यासाठी) चाकण – मोशी – मॅगझीन चौक – दिघी – पुणे 2) (सोलापूरकडे जाण्यासाठी) चाकण – पिंपळगाव फाटा – मरकळ – लोणीकंद
* वडगाव घेणंद – आळंदी रस्ता (विश्रांतवाडी येथे बंद) पर्यायी मार्ग – वडगाव घेणंद – पिंपळगाव फाटा – चाकण – नाशिक महामार्ग
* मरकळ – आळंदी रस्ता (पीसीएस कंपनी फाटा येथे बंद) पर्यायी मार्ग – 1) मरकळ – सोळू – धानोरे – च-होली खुर्द (पीसीएस कंपनी फाटा) – बायपास रोडने च-होली बुद्रुक – पुणे 2) मरकळ – कोयाळी – वडगाव घेणंद – पिंपळगाव फाटा – चाकण
* चिंबळी – आळंदी रस्ता (केळगाव चौक) पर्यायी मार्ग – चिंबळी – मोशी – भोसरी – मॅगझीन चौक – दिघी – पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.