नवी दिल्ली – बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत आपल्या अभिनय कौशल्याचा प्रसार करणारे अभिनेते प्रकाश राज नेमची आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून चर्चेत असतात. प्रकाश राज त्याच्या दमदार अभिनय आणि निर्दोष शैलीसाठी ओळखला जातो. प्रकाश राज सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि जवळपास प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडताना दिसतात. भाजपवर निशाणा साधण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. अनेकवेळा प्रकाश राज त्याच्या वक्तव्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचवेळी पुन्हा एकदा अभिनेत्याचे एक ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.
यामध्ये अभिनेत्याने इस्रोचे माजी प्रमुख शिवन यांची खिल्ली उडवली आहे आणि चांद्रयान 3 चीही खिल्ली उडवली आहे. या ट्विटनंतर प्रकाश राज याना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. यूजर्स देशद्रोही म्हणत सोशलवर ट्रोल करत आहे. मात्र, अश्यातच आता प्रकाश राज यांच्या विरोधात कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 मिशनवरून अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विट करून पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता हिंदू संघटनेच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अश्या प्रकारचे ट्विट करणे प्रकाश राज यांच्या चांगलच अंगलट आलं आहे.
काय होत प्रकाश राज यांचं ट्विट…!
BREAKING NEWS:-
First picture coming from the Moon by #VikramLander Wowww #justasking pic.twitter.com/RNy7zmSp3G— Prakash Raj (@prakashraaj) August 20, 2023
अभिनेता प्रकाश रा इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचे चांद्रयान-3 ची खिल्ली उडवणारे एक व्यंगचित्र शेअर केले आहे, ज्यामध्ये ते शर्ट आणि लुंगी घालून एका मगवरून दुसऱ्या मगवर चहा ओतताना दिसत आहे. हे व्यंगचित्र शेअर करत प्रकाश राज यांनी लिहिले आहे की, ‘ब्रेकिंग न्यूज! चंद्राचा पहिला फोटो #vikramlander.’ या आशयाची पोस्ट त्यांनी केली होती.