पुणे – घर फोडल्यामुळे भाजपला निवडणुकीत पराभवाला सामोरे जाव लागल आहे अस विधान काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल होत.पटोलेंच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची घर फोडण्याची मोठी परंपरा आहे असा पलटवार पाटील यांनी केला. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना पाटील यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपले मत व्यक्त केले.
सत्ता आल्यानंतर त्याचा दुरुपयोग कोणी केला.विश्वास घात कोणी केला. उद्धवजींची शिवसेना रोज उठून गद्दारी केली,गद्दारी केली अस म्हणत आहे.तुम्ही 2019 ला काय केले ? असा सवालही यावेळी पाटील यांनी उपस्थित केला.
तुम्ही गद्दारीच केली ना,राष्ट्रवादी म्हणत आहे.त्यांनी यांची माणस पळवली.पण तुम्ही आमच्या उद्धवजीना पळवल.आमच अतिशय गुण्यागोविंदाने चालला होता. तुम्ही त्यांना फितवल,पळवल.अशी टोलेबाजी देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच ते पुढे म्हणाले की,आम्ही सर्वजण सहनशील आहोत म्हणजे भित्रे नाही.घर कोणी कोणाची फोडली.गद्दारी कोणी केली.पाठीत खंजीर कोणी खुपसला.यावर वेगळी पत्रकार परिषद घेण्याची इच्छा असल्याच पाटील यांनी यावेळी सांगितलं.
पोट निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होणार
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे.त्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा दिल्ली येथून आज संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. तसेच सहा तारखेला उमेदवार अर्ज दाखल केला जाणार आहे.अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.