पुणे – करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सध्या देशभरात लॉकडाउन पाळण्यात येत आहे. या काळात प्रत्येकाला घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाचे पालन करणाऱ्या व्यक्तीला आता केंद्र सरकारच्यावतीने प्रमाणपत्रही मिळणार आहे. हे प्रमाणपत्र ऑनलाइन मिळणार आहे.
घरात बसूनच आपल्याला हे प्रमाणपत्र मिळवायचे आहे. त्यासाठी आपल्याला केंद्र सरकारचे “मेरी सरकार’ हे ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे. हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला स्टे होम ही लिंक ओपन करायची आहे.
ही लिंक ओपन झाल्यावर आपण आपली माहिती भरावयाची आहे. त्यात आपले नाव राहण्याचा पत्ता आणि घरात असलेला सेल्फी फोटो काढायचा व फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर मोबाइल नंबर आणि ई-मेल टाइप करायचा आहे.
हे सर्व केल्यानंतर पुढील काही वेळातच आपल्या ई-मेलवर हे प्रमाणपत्र मिळणार आहे. ही सुविधा केंद्र सरकारने घरी राहून आदेशाचे पालन करणाऱ्यांसाठी केली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी घरी राहून हे प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहनही सरकारने केले आहे. पुढील लिंकवर आपल्याला हे प्रमाणपत्र मिळणार आहे- https://pledge.mygov.in/stayathome/