मुंबई – सुप्रसिद्ध तमिळ चित्रपट अभिनेता विशाल (Famous Tamil film actor Vishal )याने सेन्सॉर बोर्डाच्या मुंबई कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर चित्रपट पास करण्याच्या बदल्यात साडेसहा लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय या प्रकरणी कठोर असल्याचे दिसत असून आरोपांची चौकशी करण्यासाठी एका अधिकाऱ्याला मुंबईला पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
#Corruption being shown on silver screen is fine. But not in real life. Cant digest. Especially in govt offices. And even worse happening in #CBFC Mumbai office. Had to pay 6.5 lacs for my film #MarkAntonyHindi version. 2 transactions. 3 Lakhs for screening and 3.5 Lakhs for… pic.twitter.com/3pc2RzKF6l
— Vishal (@VishalKOfficial) September 28, 2023
विशालच्या ट्विटनंतर शुक्रवारी या प्रकरणाने जोर पकडला. अनेक सेलिब्रिटींनी हे आरोप गंभीर असल्याचे म्हटले. आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्विट करून तपासाबाबत सांगितले आहे. मंत्रालयाने ट्विट केले की, “अभिनेता विशालने CBFC (सेन्सॉर बोर्ड) मध्ये उपस्थित केलेला भ्रष्टाचाराचा मुद्दा अत्यंत दुर्दैवी आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला आजच मुंबईत पाठवले जात आहे, जेणेकरून या प्रकरणाची चौकशी करता येईल.’
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की इतर लोक, ज्यांच्यासोबत अशा घटना CBFC द्वारे घडल्या आहेत, ते त्या घटनांची माहिती jsfilms.inb@nic.in वर देऊ शकतात.
काय आहेत विशालचे आरोप?
विशाल हा तमिळ चित्रपटांचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांनी गुरुवारी एक ट्विट केले, ज्यामध्ये CBFC (सेन्सॉर बोर्ड) च्या मुंबई कार्यालयावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्याने त्याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये संपूर्ण घटनेची माहिती सांगितली आहे. मार्क अँटनी या त्याच्या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन सेन्सॉर बोर्डाने पास करून घेण्यासाठी त्याला ६.५ लाख रुपयांची लाच द्यावी लागल्याचा दावा विशालने केला आहे.
विशालच्या म्हणण्यानुसार, त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सेन्सॉर बोर्डाच्या दोन अधिकाऱ्यांना 3 लाख रुपये आणि चित्रपटाच्या प्रमाणपत्रासाठी 3 लाख 50 हजार रुपये दिले. विशालने सांगितले की, काल त्याच्या चित्रपटाची रिलीज डेट असल्याने त्याला पैसे द्यावे लागले. सेन्सॉर बोर्डातील भ्रष्टाचारावर संताप व्यक्त करत ते म्हणाले की, चित्रपटांमध्ये घडले तर ठीक आहे, पण वास्तविक जीवनात तसे होऊ नये. आपल्या पोस्टमध्ये त्याने दोन लोकांची नावे आणि त्यांचे खाते क्रमांक देखील शेअर केले आहेत. Famous Tamil film actor Vishal