‘72 हूरें’ नावाचा आणखी एक आगामी चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जूनच्या सुरुवातीला निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता, ज्यामध्ये ओसामा बिन लादेन, अजमल कसाबसारखे दहशतवादी दिसत होते. आता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचा ट्रेलर पास करण्यास नकार दिला आहे.
‘72 HOORAIN’ FIRST LOOK OUT NOW… 7 JULY RELEASE… #FirstLook of two-time #NationalAward winner #SanjayPuranSinghChauhan’s #72Hoorain… In *cinemas* 7 July 2023.#72Hoorain is produced by #GulabSinghTanwar, #KiranDagar and #AnirudhTanwar… Co-produced by #AshokePandit.… pic.twitter.com/fkCqvqNTkp
— taran adarsh (@taran_adarsh) June 4, 2023
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ठरवते की, चित्रपट किंवा त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या मते बनवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बसतो की नाही. त्यानंतर CBFC हा चित्रपट पास करतो. ‘72 हूरें’ला सेन्सॉर बोर्डाकडून हिरवी झेंडी मिळाली आहे, पण आता ट्रेलर पास झालेला नाही. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयानंतर निर्माते 72 हूरेंचा ट्रेलर थिएटरमध्ये दाखवू शकणार नाहीत. आता निर्माते 28 जून रोजी डिजिटल पद्धतीने ट्रेलर रिलीज करतील. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय पूरण सिंह आहेत, ज्यांना दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
त्याचबरोबर किरण डागर, गुलाब सिंग तन्वर, अनिरुद्ध तन्वर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तसेच अशोक पंडित या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आता या प्रकरणाचे पुढे काय होते ते पाहावे लागेल. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट दहशतवादाला प्रोत्साहन देणार्यांच्या विरोधात असेल हे टीझर पाहूनच कळते. टीझरमध्ये हाफिज सईद, बिलाल अहमद यांसारख्या दहशतवाद्यांचीही झलक दिसत होती. हा चित्रपट 7 जुलै रोजी रिलीज होणार आहे.