मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘गहराइयां’ हा चित्रपट नुकताच 11 फेब्रुवारी 2022 रोजी वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य कारवा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केलं आहे.
या चित्रपटात दीपिकाचे सिद्धांतसोबत अनेक किसिंग सीन असून, या दोघांची बोल्ड केमेस्ट्री दिसत आहे. ‘गहराइयां’ हा चित्रपट एक रिलेशनशिप ड्रामा असून, तरूणाईची स्वच्छंद जगण्याची उर्मी आणि यादरम्यानची नात्यांची गुंतागुंत हे सगळं चित्रपटात पाहायला मिळतं. दरम्यान, चित्रपटात दाखवण्यात आलेला दीपिका आणि सिंद्धांत यांचा एक किसींग सीन सध्या चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आता दीपिकावर टीकाही होत आहे. तर दुसरीकडे अनेक नेटकऱ्यांनी सोशलवर हा चित्रपट आवडला नसल्याचे कंमेंट्स करत सांगितले आहे. काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे,
यातच नुकतीच या चित्रपटाची सक्सेस पार्टी देखील दणक्यात पार पडली. संपूर्ण टीमं या सक्सेसचं सेलिब्रेशन केलं आहे. सक्सेस पार्टीचा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडिया नेटकऱ्यांनी गहराइयाँच्या टीमला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. फ्लॉफ चित्रपटाची कुठे पार्टी करताय, असा टोलाही नेटकऱ्यांनी दीपिका आणि इतर कलाकारांना लगावला आहे.