हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. येथील एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला आहे. स्फोटानंतर मोठी आग लागली. असून या स्फोटात 7 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 10 जण गंभीररीत्या भाजले आहेत.
Seven dead, 10 injured in explosion in factory where firecrackers were being made in Himachal Pradesh's Una district: Official
— Press Trust of India (@PTI_News) February 22, 2022
स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या आगीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले आहेत.
मृतांमध्ये तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश असून स्फोटावेळी ती तिच्या आईसोबत होती. प्राथमिक माहितीनुसार, मृत महिला या यूपीच्या असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवणे बाकी आहे.