वाल्हे – करोना व ओमायक्रॉनचा संक्रमण अद्याप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा न करता, स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करावा. या अनुषंगाने गुरुवारी (दि. 17) वाल्हे येथील जेजुरी पोलीस ठाण्यांच्या अंकित वाल्हे दूरक्षेत्रामधील शिवप्रेमी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर सूचना करण्यात आल्या.
यावेळी, जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वाल्हे परिसरातील मांडकी येथील राहुल जगताप, योगेश काशीद, योगीराज जगताप, रोहित भोसले, दौंडज येथील यश जाधव, संदेश पवार, पिंगोरी येथील प्रकाश शिंदे, आडाचीवाडी येथील सागर पवार, राख व पवार कॉलनीतील श्रीकांत पवार आदी उपस्थित होते. तर पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी आभार मानले.