तापसी पन्नू सध्या नैनितालमध्ये “ब्लर’च्या शूटिंगमध्ये खूप बिझी आहे. त्यामुळे तिचा 34 वा वाढदिवस काल “ब्लर’च्या सेटवर साजरा केला गेला. या सिनेमामध्ये तिच्याबरोबर गुलशन देवाईयादेखील असणार आहे. गुलशन देवाईयाने तिला सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सेटवर तापसीच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटोही त्याने शेअर केले आहेत.
तापसीनेही इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. याबरोबर गेला आठवडा आपल्यासाठी खूपच चॅलेंजिंग होता, असेही तिने म्हटले आहे. तिने वाढदिवसाच्या दिवशीचा आपला एक फोटोही शेअर केला आहे. त्यामध्ये ती सूर्याकडे एकटक बघत असलेली पाठमोरी उभी दिसते आहे.
गेला आठवडा जरी आपल्यासाठी खूप थकवणारा असला तरी आता यापुढील आव्हानांना सामोरी जाण्यासाठी नवीन वर्षात आपल्याला खूप नवीन ऊर्जा मिळाली आहे, असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तापसीच्या “हसीन दिलरुबा’ला प्रेक्षकांनी आणि विश्लेषकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तिने आता आपल्या बिझी शेड्यूलला आणखीच बिझी बनवले आहे. “आउटसायडर्स फिल्म्स’ नावाने तिने स्वतःची प्रॉडक्शन कंपनीही सुरू केली आहे.