अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड सिनेमा “बेल बॉटम’ 19 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा सिनेमा मे महिन्यात रिलीज होणार होता. मात्र, करोनाच्या साथीमुळे अन्य सिनेमांप्रमाणे या सिनेमाची रिलीज डेटदेखील पुढे ढकलली गेली होती.
View this post on Instagram
आता या सिनेमाच्या रिलीजबरूोबर एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. “बेल बॉटम’ चक्क 3 डीमध्ये रिलीज केला जाणार आहे. स्वतः अक्षय कुमारने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. अक्षयने या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. “19 ऑगस्टला पूर्ण फिलसह थ्रीलचा अनुभव घ्या आणि बेलबॉटम 3 डीमध्ये एन्जॉय करा.’
View this post on Instagram
असे त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाचा पूर्ण आनंद घ्यावा, यासाठी सिनेमाला 3डी मध्ये बनवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. त्यासाठी सिनेमाच्या व्हिज्युअलबरोबर साऊंडलादेखील 3डीच्या अनुषंगाने डिझाइन केले गेले आहे.
View this post on Instagram
अक्षय कुमारने या सिनेमाचे शूटिंग केवळ 35 दिवसांत संपवले आहे. स्कॉटलंड आणि लंडनमध्ये या क्राईम थ्रीलर सिनेमाचे शूटिंग झाले आहे. 1980 च्या दशकातील कथेमध्ये अक्षय कुमार रॉ एजंटच्या रोलमध्ये दिसणार आहे.