मुंबई :– आयसीआयसीआय बॅंकेच्या कर्ज फसवणुक प्रकरणी बॅंकेच्या माजी सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दिपक कोचर आणि व्हिडिओकॉन समूहाचे संस्थापक वेणूगोपाल धूत यांच्या कोठडीत 29 डिसेंबरपर्यत वाढ करण्यात आली आहे. सीबीआय कोठडी संपल्याने आज त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते.
या प्रकरणी न्यायधीश एस. एम. मेनजोगे यांच्यासमोर आजची सुनावणी पार पडली. या सुनावणीत सीबीआयकडून तिन्ही आरोपींच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली. तर कोचर दाम्पत्य आणि धूत यांच्या वकिलांकडून सीबीआयच्या मागणीला विरोध दर्शविण्यात आला. मुळात आरोपींकडे तपासयंत्रणेला देण्यासारखे काहीही नाही, जे होते ते आधीच तपास अधिकाऱ्यांना दिलेले आहे, असा युक्तीवाद कोचर दाम्पत्य आणि धूत यांच्या वकिलांनी केला आहे.
तिन्ही आरोपींचा जबाब नोंदवून झाला आहे. आता आणखीन काय चौकशी करणं बाकी आहे? आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं सीबीआयला विचारला. आम्ही केस डायरी बनवली आहे, अद्याप तपास सुरू आहे. चौकशीचे तपशील तपासाच्या या टप्प्यावर जाहीर करता येणार नाहीत, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली.
Washington : गोठलेल्या तलावावरून चालणं जीवावर बेतलं; अमेरिकेत 3 भारतीयांचा बुडून मृत्यू
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने कोचर दाम्पत्य आणि वेणुगोपाल धूत यांच्या कोठडीत 29 डिसेंबरपर्यत वाढ केली.