Chanda Kochhar : आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर यांच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्याविरुद्ध नवी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कोचर आणि इतर 10 जणांवर एका खासगी कंपनीमध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे.
2009 चे हे प्रकरण नुकतेच चर्चेत आले जेव्हा 9 डिसेंबर रोजी पटियाला हाऊस कोर्टाने दिल्ली पोलिसांना तपास सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 20 डिसेंबर रोजी फसवणूक आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपांवरून एफआयआर नोंदवला. यात कंपनीचे २७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या एफआयआरमध्ये चंदा कोचर, संदीप बक्षी (सीईओ आणि एमडी आयसीआयसीआय बँक), विजय झगडे, अनामित अधिकारी, अतुल कुमार गोयल, के.के. बोर्डिया, अखिला सिन्हा, मनोज सक्सेना आणि के.के. भाटिया यांचा समावेश आहे.