वॉशिंग्टन :- अमेरिकेत एका गोठलेल्या तलावात बुडाल्याने भारतीय वंशाच्या तिघांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील ऍरिझोना प्रांतात एका गोठलेल्या तलावावरून चालत असताना बर्फ फुटल्यामुळे हे तिघे तलावात पडले होते.
ही घटना 26 डिसेंबर रोजी ऍरिझोना प्रांतातील कोन्कोनिनो कौंटीतील वुडस कॅनॉन लेक येथे घडली. तलावात पडलेले तिघे नंतर बर्फाच्या पाण्यामध्ये मृतावस्थेमध्ये आढळले होते.
नारायण मुद्दना (49 वर्षे), गोकूळ मेडिसेती (47 वर्षे) आणि हरिता मुद्दना अशी मरण पावलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही ऍरिझोना प्रांतातील चांडलर भागातील रहिवासी होते आणि ते मूळचे भारतीय वंशाचे होते, असे कोन्कोनिनो कौंटीच्या शेरीफ कार्यालयाने म्हटले आहे.
Japan : वादळी हिमवृष्टीमुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू; 90 हून अधिक….
चांडलर हे फिनिक्स शहराचे उपनगर आहे. या भागातील गोठलेल्या तलावापासून दूर राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.