कैरो – सुएझ कालव्यात अडकलेले कच्चे लोखंड घेऊन जाणारे एक मालवाहू जहाज आज पुन्हा मार्गस्थ झाले. यामुळे या अरुंद सागरी मार्गातील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. सुएझ कालव्यातील सागरी वाहतुकीचे व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेचे प्रमुख ओस्सामा राबेई यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मार्शल आयलंडचा ध्वज असलेले एमव्ही ग्लोरी हे मालवाहू जहाज या कालव्यातून जात असताना तांत्रिक अडचण निर्माण झाली. हे जहाज नादुरुस्त झाल्यामुळे जागेवरच थांबवावे लागले. या जहाजाच्या मदतीसाठी अधिकाऱ्यांना 4 टगबोटी रवाना कराव्या लागल्या होत्या, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
कालव्यात बंद पडलेले हे जहाज ग्रीक कंपनी प्रिमेरा शिपींग कंपनीच्या मालकीचे आहे. हे जहाज चीनला जात असताना सुएझ कालव्यातच इस्माइलिया प्रांतातील कांतारा शहराजवळ बंद पडले होते. टगबोटींच्या मदतीने ओढून पुन्हा सुरू केल्यानंतर हे जहाज जवळच्या दुरुस्ती केंद्राकडे ओढून नेण्यात आले असे रबेई यांनी सांगितले.
Mumbai : अनिल अंबानींना ‘या’ प्रकरणी उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा कायम
सुएझ कालव्यात हे मालवाहू जहाज बंद पडल्यामुळे तेथील सागरी वाहतूक काही काळ खंडीत झाली होती. एकूण 51 जहाजे मार्ग मोकळा होण्याची वाट बघत खोळंबून राहिली होती. आता ही जहाजेही मार्गस्थ झाली आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.