1. बोल्सेनारो यांच्या समर्थकांकडून सरकारी कार्यालयांमध्ये धुडगूस
2. पोलिसांनी बळाचा वापर करून हजारो कार्यकर्त्यांना केली अटक
3. अध्यक्षीय राजवाडा, सर्वोच्च न्यायालय आणि सरकारी कार्यालयाचा घेतला ताबा
रिओ डी जानेरिओ, (ब्राझिल) – ब्राझिलमध्ये लुला यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतरही माजी अध्यक्ष जेर बोल्सेनारो यांनी अध्यक्षीय निवडणुकांचा निकाल स्विकारण्यास अजूनही तयारी दाखवलेली नाही. बोल्सेनारो यांच्या समर्थकांनी देशातील प्रमुख सरकारी कार्यालये, सर्वोच्च न्यायलय, अध्यक्षीय राजवाडा आदी महत्वाच्या इमारतींमध्ये घुसून धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तेथे दंगल सदृश स्थिती निर्माण झाली होती.
या सगळ्या प्रकारामुळे अमेरिकेत 6 फेब्रुवारी 2021 रोजी तत्कालिन अध्यक्ष ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलमध्ये घुसून घातलेल्या धुडगूस प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बोल्सेनारो यांच्या हजारो समर्थकांनी या महत्वाच्या इमारतींच्या सुरक्षा व्यवस्थेला पार करून आणि तेथील सुरक्षा अडथळा ओलांडून इमारतींमध्ये घुसखोरी केली आहे. या इमारतींच्या छतांवर शेकडो कार्यकर्ते चढले आणि या इमारतींमधील मालमत्तेची प्रचंड नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. या इमारतींच्या खिडक्यांची तावदानेही या दंगलखोरांनी फोडून टाकली आहेत. आठवड्याचे अखेरचे दिवस असल्यामुळे या तिन्ही इमारतींमध्ये वर्दळ नव्हती. त्यामुळे तेथे हिंसाचार झाला नाही. या आंदोलकांनी ब्राझिलचा राष्ट्रध्वज असलेल्या हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या कक्षात बोल्सेनारो यांच्या विरोधातील निकाल सुनावला गेला, त्या कक्षाचीही प्रचंड मोडतोड केली.
ब्राझिलमध्ये झालेले सत्तांतर अवैध असून लष्कराने तेथे हस्तक्षेप करावा किंवा हे सत्तांतर रद्द करून बोल्सेनारो यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदी नियुक्त करावे, अशी मागणी काही आंदोलकांनी केली. या आंदोलकांचा या तिन्ही इमारतींमध्ये काही तास धुडगूस सुरू होता. मात्र सुरक्षा रक्षकांनी थेट कारवाईचा इशारा दिल्यानंतर आंदोलकांना तेथून हटवण्यात आले. यावेळी हजारो कार्यकर्त्यांना अटक देखील करण्यात आली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/cargo-vessel-refloated-after-running-aground-in-suez-canal/
पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. लाठीमार देखील केला आणि हजारो आंदोलकांना ताब्यात घेतले. मात्र हे आंदोलक जेंव्हा या इमारतींमध्ये घुसत होते, तेंव्हा पोलिसांनी काहीच का केले नव्हते, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/bombay-hc-restrains-i-t-dept-from-taking-action-against-anil-ambani-under-black-money-act-till-feb-20/
लुला यांच्याकडून कडक शब्दात निर्भत्सना
बोल्सेनारो यांच्या समर्थकांनी घातलेल्या या धुडगुसावर अध्यक्ष लुला यांनी कडक टीका केली आहे. हा सर्व प्रकार म्हणजे “फॅसिस्ट’ विचारधारेचा प्रभाव असल्याचे लुला यांनी म्हटले आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी सुरक्षा व्यवस्था केंद्रीय यंत्रणेच्या ताब्यात घेण्याचे आदेश देखील लुला यांनी दिले आहेत. सरकारी इमारतींमध्ये घुसणाऱ्या या निदर्शकांनी हा धुडगूस ज्या पद्धतीने घातला त्याची तुलना कशाबरोबर देखील केली जाऊ शकत नाही. हा धुडगूस घालणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे, असेही लुला यांनी म्हटले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/dmk-its-allies-walk-out-of-assembly-over-tamil-nadu-governors-remark/
बोल्सेनारो फ्लोरिडामध्ये
लुला यांचा अध्यक्षपदी शपथविधी होण्यापूर्वीच जेर बोल्सेनारो फ्लोरिडाला रवाना झाले आहेत. आपल्या समर्थकांनी केलेला आंदोलनाबद्दल त्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र तोडफोड आणि घुसखोरीचे आपण समर्थन करत नसल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.