पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लोणावळा लगतच्या शिलाटने हद्दीत सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्येएका कारचा चुराडा झाला आहे.
कंटेनर आणि कारमध्ये धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. शिलाटणे गावाजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना कारचालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं. शिलाटणे गावाजवल महामार्गावर ही कार दुभाजक ओलांडून पलीकडच्या दिशेला गेली. कारचा वेग इतका होता की समोरून येणाऱ्या कंटेनरच्या खाली ही कार घुसली.
Breaking : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू! pic.twitter.com/XG34IifmMX
— Pravin Wadnere (@pravinwadnere) January 30, 2022
या अपघाताचा तडाखा इतका भीषण होता की यामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झाला. यात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मृत प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यासंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस अधिकचा तपास करत आहेत, अशी माहिती लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली आहे.