मुंबई – ब्रीच कॅन्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या गान कोकिळा आणि भारतरत्न ‘लता मंगेशकर’ यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती काही दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रवक्त्याने अधिकृतपणे दिली होती.
92 वर्षीय लता मंगेशकर यांना करोनाची बाधा झाल्यामुळे 9 जानेवारी रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात होते. लता दीदी पहिल्या दिवसापासूनच आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.
दरम्यान, आता दीदींच्या तब्येतीत आधी पेक्षा जास्ती सुधारणा पाहायला मिळत असल्याचे रुग्णालयातील डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितले आहे. डॉ. प्रतीत समदानी म्हणतात की.., “लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा पाहायला मिळाल्यानंतर त्यांचं व्हेंटीलेटर सपोर्टही हटवण्यात आलं आहे.
पण त्या अजूनही आयसीयू विभागातच आहेत. त्यांना विशेष निगराणीखाली ठेवण्यात आली आहे.” असं ते म्हणाले. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने या बद्दल माहिती दिली आहे.